
पुण्यात दारु पिऊन महिलेचा भररस्त्यात घातला जोरदार राडा
राड्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, शिव्यांची लाखोळी वाहत केले ट्रॅफिक जॅम, नागरिक संतप्त
पुणे – पुण्यात मागील काही दिवसापासून कायदा सुव्यवस्था ढासळल्याच्या घटना घडल्या आहेत. आता पुण्यातील वानवडी येथील जगताप चौकात एका महिलेने मद्यधुंद धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पुण्यातील वानवडी येथील जगताप ह चौकात ही घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री जगताप चौकात एका महिलेने मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला. तिने स्थानिकांना शिवीगाळ करत असभ्य वर्तन केले. व्हायरल व्हिडीओत मद्यधुंद महिला स्थानिकांशी हुज्जत घालताना आणि त्यांच्याशी असभ्य वागताना दिसून येत आहे. पुणे स्टेशन परिसरातील सतत सुरू असणाऱ्या काही पब्स मधून ही पार्टी करून आल्याची माहिती प्राथमिक मिळली आहे. महिला सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करत होती. या प्रकारामुळे घटनास्थळी गर्दी जमल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या प्रकारामुळे वानवडी भागातील नागरिक संतप्त झाले आहेत. अनेकांनी पोलिसांना यावर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. वानवडी पोलिस ठाण्याकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान या प्रकारामुळे वानवडी भागातील नागरिक संतप्त झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते ललित ससाणे यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखण्याचे आणि पोलिसांनी अशा घटनांवर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेनंतर पुन्हा एकदा सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पब आणि बारमधून मद्यधुंद स्थितीत बाहेर पडणाऱ्या लोकांमुळे अनेकदा अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पोलीसांनी अशा बार आणि पब यांना सुचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.