Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात हळहळ ; लग्नानंतर गेले होते लोणावळा फिरायला; कुटुंबातील ५ जण गेले वाहून

पुणे शहरातील अन्सारी आणि खान कुटुंब लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते. चार दिवसांपूर्वीच या कुटुंबाकडे लग्न होते. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे लग्नाचा थकवा घालवण्यासाठी लोणावळ्यात जाण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला.भुशी डॅम्पच्या ठिकाणी वर्षाविहारचा आनंद ते घेत होते. परंतु पुढे काळाने त्यांच्यासमोर काय लिहिले आहे? हे त्यांनाही माहीत नव्हते. एका दिवसात घरातील आनंदाच्या वातावरणाचा रुपांतर दु:खात झाले. कुटुंबातील पाच जण सर्वांना सोडून गेले.

अन्सारी आणि खान कुटुंबियांकडे २७ जून रोजी लग्न होते. त्यानंतर दोन दिवसानंतर वलिमाचा (लग्नानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम) कार्यक्रम होतो. तो कार्यक्रम २९ तारखेला झाला. त्यामुळे लग्नाचा थकवा घालवण्यासाठी ३० तारखेला या कुटुंबियाने लोणावळ्यात जाण्याचा निर्णय घेतला. सकाळीच ते एका टेम्पो ट्रॅव्हलने निघाले. लोणावळ्यात १२ वाजता पोहचले. एकूण १७ जण लोणावळ्यात आले होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर दुपारी दोन वाजता भावाचा फोन आला. तो प्रचंड घाबरलेला होता. त्याची मुलगी वाहून गेली. त्याच्या फोननंतर मी तातडीने निघालो आणि लोणावळ्यात आलो.

पुण्यातील लोणावळ्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण धबधब्यात वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. वाहून गेलेल्यामध्ये चार जणांचे मृतदेह सापडले आहे. त्यातील एक मृतदेह शोधण्याचे काम अजूनही सुरुच आहे. साहिस्ता लियाकत अन्सारी (वय- 36), अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 13), उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 8) अदनान अन्सारी (वय- 4), मारिया अन्सारी (वय- 9) हे पाच जण वाहून गेले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे आणि मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, प्रांत सुरेंद्र नवले, नायब तहसीलदार गणेश तळेकर, लोणावळा मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!