पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली? पोलिसांकडून काय चुका झाल्या?ते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. “अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना घेतला होता. ज्यावेळी रक्ताच्या नमुन्यात अल्कोहल नाही, लक्षात आलं, त्यावेळी पोलिसांना स्ट्राइक झालं, की, काहीतरी गडबड आहे. पोलिसांनी तात्काळ त्याचा डीएनए घेतला. रक्ताचा नुमना त्या डीएनएशी मॅच केला. वडिलांचा डीएनए घेतला तो मॅच केला. आरोपीचा डीएनए रक्ताच्या नमुन्याशी मॅच होत नव्हता. पोलिसांनाी तात्काळ कारवाई केली. डॉक्टरांना अटक केली” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“डॉक्टरने 3 लाख रुपये घेऊन रक्ताचे नमुने बदलल्याच मान्य केलं. या सर्व बाबी रेकॉर्डवर आल्या पाहिजेत. आरोपपत्र दाखल केलं. अपघाताच्यावेळी गाडीत लॉक झालेला स्पीड 110 किमी आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “घरापासून सीसीटीव्ही फुटेज जप्त केलं. पहिला ज्या बारमध्ये गेला, तिथलं सीसीटीव्ही फुटेज, फूड बील जप्त केलय. दुसऱ्याबारमध्ये गेला तिथलं सीसीटीव्ही फुटेज आहे. आता लीगल आणि टेक्निकल पुराव्यांची कमतरता नाहीय” असं फडणवीस म्हणाले.
“आपला मुलगा प्रौढ नाहीय हे माहित असूनही वडिलांनी त्याला गाडी चालवायला दिली. म्हणून ज्युवेनाईल जस्टिस कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ज्या मॅनेजर्सनी त्यांना दारु दिली, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय. आरोपीच्या आजोबांनी ड्रायव्हरला गुन्हा अंगावर घ्यायला सांगितला. तो पोलिसांकडे गेला, मी गाडी चालवत होता म्हणून सांगितलं. पण पोलिसांनी मान्य केलं नाही. आजोबांनी ड्रायव्हरला कोंडून ठेवलं. पण त्याने गुन्हा मान्य केला नाही. वडिल आणि आजोबांवर किडनॅपिंगची केस लावली आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.“आरोपीला 3 वाजता आणलं, त्याला लगेच मेडीकलला पाठवायला पाहिजे होतं. पण साडेआठला पाठवलं. वरिष्ठांना तात्काळ कळवायला पाहिजे होतं. पण ते कळवलं नाही. याचा सगळा रेकॉर्ड केस डायरीमध्ये आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्याने ड्युटी नीट केली नाही त्याला निलंबित केलय. ज्या पब्सनी अटी, शर्तींच उल्लंघन केलं, अशा 70 पब्सवर कारवाई केलीय” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.