
रेल्वेत दोन महिलांचे झिंज्या ओढत, साड्या फाडत हाणामारी
महिलांच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, भांडणे पाहून आवक व्हाल!
मुंबई – ट्रेन आणि त्यात होणारे वाद हे ठरलेले समीकरण आहे. हे वाद कधीकधी हणामारीपर्यंतही जातात.ट्रेनमधील हाणमारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आत्ताही ट्रेनमधील दोन महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात दोन महिला एकमेकींशी जोरजोरात भांडत फ्री स्टाईल हाणमारी करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका ट्रेनमध्ये दोन महिला मारामारी करताना दिसत आहेत. एकमेकींचे केस ओढत दोघी जोरजोरात भांडताना त्या एकमेकांची साडी देखील फाडण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे त्यांचीही मारामारी बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. पण कोणीही त्यांची भांडणे सोडवण्यासाठी पुढे येत नव्हते, अखेर त्यांची भांडणे सोडवण्यासाठी टीसीला मध्यस्थी करावी लागली. या मारामारीत दोन्ही महिलांनी अक्षरशः एकमेकींना झोडपडून काढलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला आणि नंतर तो सोशल मीडियावर शेअर केला. २०२५ मधील ट्रेनमधील पहिला व्हिडिओ म्हणून सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
महिलांच्या या हाणामारीचा व्हिडिओ @sanjaykumar373136kalu नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘जनरल ट्रेनचा व्हिडीओ” असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनेकांनी कमेंट्स करत महिलांच्या या मारामारीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.