Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यातली घटना ; लंगडत लंगडत बस स्टँडला आला, एसटी अचानक सुरू झाली अन्…

पुण्यातील भोरमध्ये एसटी बस स्थानकात चाकाखाली चिरडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.तरुण बसच्या समोरून डाव्या बाजूनं पलीकडे उजव्या बाजूला जात असताना अचानक बस चालकाने बस पुढं घेतली.यावेळी बसचं चाक अंगावरून गेल्यानं रुपेश याचा मृत्यू झाला.

बसखाली चिरडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव रुपेश गायकवाड असं आहे. तरुणाच्या पायाला दुखापत झाली होती. तो लंडगत चालत असल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसतं.पायाला असलेल्या दुखापतीमुळे चालताना तरुणाला वेदना होत होत्या. तो हळू हळू चालत एसटीजवळ आला आणि उभा राहिला होता. त्यानंतर काही क्षणातच एसटी चालकाने बस पुढे घेतली.एसटी बस वेगाने पुढे येताच रुपेशला पायाच्या दुखापतीमुळे पटकन बाजूला होता आलं नाही आणि तो बसखाली चिरडला गेला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!