
सोशल मीडियावर मैत्री झाल्यानंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लग्न करण्यास नकार दिला. हा प्रकार नोव्हेंबर 2023 मध्ये हडपसर परिसरात घडला आहे. याप्रकरणी 30 वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.3 जुलै) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजीत संभाजी हुलवान(रा. पंचवटिनगर, खानापुर, सांगली) याच्यावर भान्यास 64(1), 351(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी आणि फिर्य़ादी यांची सोसल मीडियावर ओळख झाली. आरोपीने आर्मीमध्ये कामाला असल्याचे सांगितले. तिला लग्नाचे आमिष दाखवून हडपसर परिसरात भेटण्यासाठी बोलवून घेतले. तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी त्याने मोबाईल मध्ये तरुणीसोबचे फोटो काढले. पिडीतेने लग्नाबाबत विचारणा केली असता फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लग्नास नकार दिला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.