Latest Marathi News
Ganesh J GIF

वाघोली परिसरामधील घटना ; सायबर चोरटयांनी केली तरुणाची 29 लाख रुपयांची फसवणूक

तुमच्या विरोधात मनी लॉन्डरिंगची तक्रार आहे तुम्हाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल, अशी कारवाईची भीती दाखवत सायबर चोरटयांनी तरुणाची तब्बल 29.49 लाख रुपयांची फसवणूक केली.याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाघोली येथील 33 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार तरुणाच्या मोबाईलवर सायबर चोरटयांनी फोन केला. तुमचे नाव मनी लॉन्डरिंगमध्ये असल्याने पार्सल कस्टम विभागाकडे अडकले आहे. तसेच त्यात अवैध अमली पदार्थ सापडले आहे. तुमच्या नावाचा गैरवापर केला जात असून त्यासाठी तुमचे आधारकार्ड व बँक खात्याचा वापर करून मनी लॉन्डरिंग करण्यात आली आहे ,असे सांगून एक लिंक पाठविली.

त्यांनतर पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगून चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल असे सांगितले. तसेच अटकेची भीती दाखवली. तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे सांगत तक्रारदार यांना 29 लाख 49 हजार रुपये चोरटयांनी सांगितलेल्या खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!