
एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला दहा रुपये देण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार वाघोली परिसरात घडला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका व्यक्तीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.26) रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान घडला आहे.याबाबत पिडीत मुलीच्या 37 वर्षीय वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जावेद उर्फ आरीफ अमीर खान याच्यावर आयपीसी 354, पोक्सो कलम 8, 12 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे . पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहत. आरोपीने फिर्यादी यांच्या 9 वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे केले.
तसेच तिला दहा रुपये देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या वडिलांना सांगितला. त्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.