Latest Marathi News
Ganesh J GIF

‘इन्स्टा क्वीन’ पोलीस अधिकारीला अटक

एप्रिलमध्ये या कारणामुळे निलंबित, शाही लाईफस्टाईल चर्चेत, कोण आहे ही इन्स्टा क्वीन?

चंदीगड – इन्स्टा रील आणि शाही लाईफस्टाईलमुळे चर्चेत असलेली निलंबित पोलीस अवनित कोैरला अटक करण्यात आली आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात ड्रग्ज प्रकरणात तिला सेवेतून कमी करण्यात आलं होते.

एप्रिलमध्ये १७.७१ ग्रॅम हेरॉईन बाळगल्याप्रकरणी अमनदीप कौरला सेवेतून कमी बरखास्त करण्यात आलं. एनडीपीएसच्या अंतर्गत तिला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर २ मे रोजी जामिनावर तिला सोडण्यात आलं होतं. पंजाब पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार पोलिसांनी तिची मालमत्ता जप्त केली आहे. तिने गेल्या काही वर्षांमध्ये जी संपत्ती कमावली त्यापेक्षा तिचा खर्च हा २८ टक्के जास्त आहे असं आढळून आलं. ज्यानंतर तिला अटक करण्यात आली.अमनदीप कौरला इन्स्टा क्वीन म्हणूनही ओळखलं जातं. अमनदीप इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे. या व्हिडीओंमध्ये अमनदीप दागिने, महागड्या वस्तू दाखवते आहे. अमनदीप कौरचं २०१८ ते २०२४ च्या दरम्यान १ कोटी ८ लाख ३७ हजार ५५० रुपये इतकं होतं. तर तिचा या कालावधीतला खर्च १ कोटी ३९ लाख ६४ हजार ८०२ रुपये होता. तिच्या उत्पन्नापेक्षा तिचा खर्च ३१ लाख २७ हजार २५३ रुपये अधिक होता.

अमनदीपची जप्त मालमत्ता

विराट ग्रीन येथील जमीन- किंमत ९९ लाख रुपये

ड्रीम सिटी, भटिंडा येथे जमीन- किंमत १८ लाख १२ हजार रुपये

थार कार – किंमत १४ लाख रुपये

रॉयल एनफिल्ड बुलेट- किंमत १ लाख ७० हजार

आयफोन १३ प्रो मॅक्स- किंमत ४५ हजार रुपये

रोलेक्स घडयाळ- किंमत समजलेली नाही

बँकेतील ठेव- १० लाखांहून अधिक आहे

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!