Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात धमकीचं सत्र सुरुच..! भारती विद्यापीठला बाॅम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिसांची धावपळ, विद्यार्थ्यांमध्ये खळबळ

पुण्यात आधी विमानतळावर बॉम्ब असल्याच्या धमकी मिळाली होती. ही घटना ताजी असतांना आता नामांकित भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला धमकीचा ई-मेल मिळाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दाखल घेऊन मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

याप्रकरणी महाविद्यालयाचे डॉ. मंदार दत्तात्रय करमरकर (वय ५५) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार एका अज्ञात ई-मेल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ महाविद्यालय व वसतिगृह बॉम्बने उडवले जाऊ शकते असे विद्यालयाला पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये नमूद करण्यात आलं होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण महाविद्यालय बॉम्ब शोधक पथकाच्या (बीडीडीएस) मदतीने शोध मोहीम राबवली. मात्र, कोठेही काही आढळले नाही.महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या ई-मेलवर एका व्यक्तीने दोन वेळा ई-मेल पाठवत विद्यालयात बॉम्बस्फोट होण्याची धमकी दिली. ई मेल पाठवणाऱ्याने तामिळनाडूतील एका घटनेचा संदर्भ देखील दिला. महाविद्यालय व वसतिगृह परिसरात बॉम्बस्फोट होणार असल्याचं डॉ. मंदार करमरकर यांनी सांगितलं.

त्यानुसार त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत भारती विद्यापीठ पोलिस ठाणे गाठत याची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय व वसतिगृह परिसराची तपासणी केली. पोलिसांनी बीडीडीएस पथकाला बोलावून संपूर्ण परिसर तपासला. मात्र, कोठेही काही ही आढळले नाही. दरम्यान, या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, तपासात काही ही आढळले नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला पोलिसांनी या मेलची तांत्रीक तपासणी केली. हा मेल परदेशातून पाठवला असल्याचं निष्पन्न झालं आहे. दरम्यान, मेल मध्ये थेट धमकी नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. ई मेलमध्ये करणाऱ्याला नेमक काय म्हणायचं होत हे स्पष्टं झालं नाही. मात्र, या मेलमुळे पोलिसांची धावपळ उडाली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!