प्रेमविवाहानंतर घडले असे की तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
या कारणामुळे नात्यात आला दुरावा, बघा भंडाऱ्यात नेमक काय घडल
भंडारा दि ३(प्रतिनिधी)- पती पत्नीमधील वाद काही नवीन नाही. संसाराचा गाडा हाकताना त्यांच्यात वादविवाद होत असतात. पण कधी कधी हे वाद इतके विकोपाला जातात की कधी कधी अघटित घटते. कारण भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात एका प्रेमविवाह केलेल्या तरुणीने विष प्राशन करत आपली जीवनयात्रा संपवली आहे.
स्नेहा राहुल कावळे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पवनी तालुक्यातील शिवनाळा येथील स्नेहा हिचा पवनी येथील राहुल कावळे याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या वर्षानंतर दोघांना एकही मुलही झाले. मात्र, काही दिवसांच्या सुखी संसारानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. राहुल याने स्नेहाला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला. त्याकारणावरुन त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यानंतरही राहुल त्रास देतच राहिला. पुढे जात राहुल स्नेहाला मारहाण देखील करु लागला. स्नेहाला होणारा त्रास तिने आपल्या वडिलांना सांगितला होता. पण तरीही राहुलचा जाच सुरूच राहिला त्यामुळे स्नेहाने विषारी औषध प्राशन केले. यातच तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी स्नेहाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. स्नेहाच्या अचानक निघून जाण्याने एका वर्षाच्या बाळाच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरवलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.