
नोकरी गेली तरी चालेल पण तुम्हाला वठणीवर आणायला दोन मिनिटं लागतील
पोलिस आधिकाऱ्याची संघटनेच्या कार्यकर्त्यांना धमकी, धमकीचा व्हिडिओ व्हायरल, यामुळे कार्यकर्ते आक्रमक
महाराजगंज – पोलीस अधिकाऱ्याने एका हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकऱ्यांचा धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या घटनेमुळे इतर संघटना आक्रमक झाल्या आहेत.
उत्तर प्रदेशच्या महाराजगंज मधील एक पोलीस अधिकारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना धमकावतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग दलाचे कार्यकर्ते एका धार्मिक उत्सवासाठी बिसोखोर गावात वर्गणी गोळा करत होते. मात्र काही ठिकाणी लोकांनी वर्गणी देण्यास नकार दिला आणि हिंदू देवी-देवतांबद्दल अपमानास्पद भाष्य केले. त्यानंतर बजरंग दलाने पोलीस ठाण्यात जाऊन निदर्शने करण्यास सुरुवात केली. पण यामुळे संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्यांने थेट त्या पदाधिकाऱ्यांना धमकवण्यास सुरुवात केली. पोलीस अधिकाऱ्याने एका कार्यकर्त्याचा मोबाईल काढून घेतला असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. ज्यामध्ये समंधीत घटनेचे पुरावे होते. त्याचबरोबर ‘मला नोकरीची पर्वा नाही. तुमच्या सर्वांचे डोकं खराब झाले आहे. तुम्हाला वठणीवर आणण्यासाठी २ मिनिटे लागतील.’ असे म्हणत धमकी दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे नाव धर्मेंद्र सिंह असून सिंह यांनी हिंदु कार्यक्रमात एका मशनरीच्या हस्तक्षेपाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पोलीस अधिकारी सिंह यांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते असभ्य वर्तन करत होते, असा दावा केला आहे. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी दखल घेतली असून दोषींवर कारवाई करण्यात येईल , असे स्पष्ट केले आहे.