के. पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकार दिन साजरा
उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांचा सन्मान, दिनदर्शिकेचेही प्रकाशन
पुणे दि ५(प्रतिनिधी)- पत्रकार दिनानिमित्त के.पी.पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये हडपसरमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी दै. सकाळचे प्रतिनिधी कृष्णकांत कोबल, दै. लोकहित न्यूजचे प्रतिनिधी तसेच मंत्रालय जनसंपर्क अधिकारी व राज्य मराठी पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख नितीन जाधव, रॉयल मिडिया न्यूज व महाराष्ट्र खबर न्यूज चॅनेलचे संपादक तुकाराम गोडसे, दै. पुढारीचे प्रतिनिधी प्रमोद गिरी, आपली चळवळचे संपादक गोरक्ष गायकवाड आणि आपली चळवळ मिडियाचे पितांबर धिवार उपस्थित होते.
उपस्थित सर्व पत्रकारांना उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल के.पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्यावतीने शब्दयोध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण डॉ. के. टी. पलूसकर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. कृपाल पलूसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी के. पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्युटच्या दिनदर्शिकेचे ही पत्रकारांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार कृष्णकांत कोबल होते. त्यांच्यासह नितीन जाधव, पितांबर धिवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ॲड. कृपाल पलूसकर यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रा. ताबिना शेख, प्रशांत अडसूळ यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्राचार्या प्रीती कदम, प्रा. किरण कुंभार, प्रा. संदीप मेमाणे, पूजा भाडळे, स्वाती जाधव, ऐश्वर्या खैरे, कोमल मुळीक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नवनाथ मगर आणि मनीषा ओहाळ यांनी तर आभार प्राचार्या प्रीती कदम यांनी मानले.