Latest Marathi News
Ganesh J GIF

‘माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील’

पुण्यात पत्नीने केले पतीच्या प्रेयसीचे अपहरण, कारमध्ये या भागात फिरवत बेदम मारहाण

पुणे – नवऱ्याचे अनैतिक संबंध रोखण्यासाठी संतप्त पत्नीने थेट नवऱ्याच्या प्रेयसीचेच अपहरण केल्याची घटना पुण्यात उघड झाली आहे. या प्रकारामुळे हिंजवडी परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत महिलेची सुटका केली आहे.

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने पतीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागली होती. पतीच्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तिने आपली आई आणि भावाच्या मदतीने पतीच्या प्रेयसीचे अपहरण केले. अपहरण करण्यात आलेली २६ वर्षीय तरुणी हिंजवडीमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात सेल्स मार्केटिंगचे काम करते. तिचे गेल्या काही महिन्यांपासून एका विवाहित पुरुषाशी प्रेम संबंध होते. ही बाब पत्नीला खटकत होती. अखेर नवऱ्याचे अनैतिक संबंध थांबवण्यासाठी संतप्त पत्नीने आपल्या भावाला आणि आईला घेऊन थेट नवऱ्याच्या प्रेयसीचे अपहरण केले. बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ब्रम्हा क्रॉप फेज-२, विप्रो सर्कल इथ एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. ‘तुमचे पार्सल द्यायचे आहे,’ असे सांगत महिलेला ऑफिसबाहेर बोलावून घेतले. त्या ठिकाणी निळ्या रंगाच्या कारमधून आरोपी पत्नी, तिचा भाऊ आणि आई उतरले. त्यांनी महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिला ताथवडे आणि वाकड परिसरात फिरवत बेदम मारहाण केली. ‘माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी ही पत्नीने तरुणीला दिली. या अपहरणाची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तातडीने हालचाल केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता आरोपी पत्नी आणि तिचे साथीदार महिलेला जबरदस्तीने कारमध्ये कोंबत असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यावरून पोलिसांनी वाहनाचा क्रमांक शोधून काढला. वाकड परिसरातून ही कार ताब्यात घेऊन पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली. नवऱ्याच्या अनैतिक संबंधांना कंटाळून आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपी पत्नीने पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली आहे.

पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली आहे. या प्रकरणात पत्नी, तिचा भाऊ व आईविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे हिंजवडीसारख्या गजबजलेल्या आयटी हबमध्ये प्रचंड चर्चेला उधाण आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!