Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्याला निघाले अन् गोव्याला पोहोचले!

विमान प्रवाशांना मिळाला अनपेक्षित 'गोवा ट्रिप'चा धक्का

पुणे शहर आणि जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी पावसाने झोडपून काढले आहे. गुरुवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीसोबतच आता हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

लोहगाव विमानतळ परिसरात पावसाचा जोर आणि ढगाळ हवामानामुळे दृश्यमानता अत्यंत कमी झाल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून इंडिगोचे विमान गोव्याला वळवण्यात आले. अहमदाबादहून पुण्याच्या दिशेने झेपावलेले इंडिगोचे 6E522 हे विमान आपल्या नियोजित वेळेनुसार पुण्यात उतरणार होते. मात्र, पुण्यात पावसाचा जोर इतका प्रचंड होता की वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती. एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि वैमानिकाने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून विमान पुण्यात उतरवण्याचा धोका न पत्करता ते थेट गोव्याच्या दिशेने वळवले.

विमान अचानक दुसऱ्या राज्यात वळवल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. अनेक प्रवासी तासनतास विमानात अडकून पडले, तर काहींचे पुण्यातील महत्त्वाचे कार्यक्रम हुकले. पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे, लोहगाव विमानतळावर येणारी इतर काही विमानेही हवेतच घिरट्या घालत होती. शहराच्या मध्यवर्ती भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!