Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रेमच! नव्या नवरीचा डान्स बघून पाहुणे झाले स्तब्ध

नवरीच्या डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, नवरदेवही लाजला, नवरीची धमाल एकदा बघाच!

पुणे – सोशल मीडियावर लग्नसमारंभातील असे अनेक व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. अगोदर लग्नात फक्त नवरदेवाचे मित्रच नाचायचे. पण आता यात बदल झाला असून लग्नाबरोबरच साखरपुडा आणि हळदीत देखील डान्स होऊ लागल आहे.

आलीकडे लग्नात नवरा आणि नवरी देखील डान्स करताना दिसून येतात. महत्वाचे म्हणजे आपल्याकडे प्रेमविवाह सहसा होत नाहीत. पण जर प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले तर मग तो अतिशय आनंदाचा क्षण असतो. सध्या एका नवरीने साखरपुड्यात जोरदार डान्स केल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, नवरीने नवरदेवाला स्टेजवर बोलवून भन्नाट डान्स केला आहे. यावेळी नवरदेवही स्टेजवर उभा आहे आणि नवरदेवाच्या बाजूलाच नवरी डान्स करत आहे. यावेळी नवरीचा डान्स पाहून नवरदेवही लाजून लाल झाला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ९ वर्ष या क्षणाची वाट पाहिली अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे दोघांच्या चेह-यावरील आनंद स्पष्टपणे दिसत आहे. महत्वाचे म्हणजे या दोघांचा उत्साह पाहून पाहुणे मात्र स्तब्ध झाले होते. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर just_another_dreamerrrrrr या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या जोडीचे काैतुक केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!