
मर्दानी! कितीबी समोर येऊ दे त्यांना एकटी बास…
सोशल मीडियावर महिलेच्या धाडसाचा व्हिडिओ व्हायरल, एक महिला धावत्या रिक्षात तीन चोरांशी भिडली, व्हिडिओ एकदा बघाच
लुधियाना – लुधियानातील एका धाडसी महिलेने धावत्या रिक्षामध्ये एकाच वेळी ३ चोरांचा सामना करत आपलं सामान वाचवलं. तिनं दाखवलेल्या या शौर्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे. रिक्षामधील तो थरार अंगावर रोमांच आणणारा आहे.
फिल्लौर-लुधियाना महामार्गावर ही घटना घडली आहे. एक महिला जालंधर-लुधियाना हायवेवर रिक्षातून प्रवास करत होती. काही वेळाने या रिक्षामध्ये तिच्यासोबत आणखी दोन प्रवासी चढले. ‘आम्ही थोड्याच अंतरावर उतरणार आहोत,’ अशी विनंती त्यांनी रिक्षा चालकाला केली. त्यामुळे महिलेने फारसा आक्षेप घेतला नाही. पण हायवेवर पोहोचताच त्या दोघांनी तिच्याकडून सामान हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तिने सुरुवातीला रिक्षाचालकाकडे मदत मागितली, पण रिक्षावाला चोरांचा साथीदार होता. त्यामुळे तिने त्या चोरांशी लढण्याचा निर्धार केला. व्हिडिओत दिसत आहे की, एक महिला ऑटो रिक्षाला लटकलेली दिसत आहे. तरी देखील हे दरोडेखोर थांबत नव्हते. ही महिला जीव धोक्यात घालून, मोठमोठ्याने ओरडत होती. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना सावध करत होती. लोकांनी या रिक्षाचा पाठलाग केला आणि चोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना आसपासच्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि आता हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी त्या महिलेची प्रशंसा करत आहेत.
सोशल मीडियावर या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे. या प्रकरणी काही जणांनी संताप व्यक्त केला आहे. या चोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नेटकरी करत आहेत.