
विवाहित प्रेयसीने केली प्रियकराची गळा चिरुन हत्या
भावाचा मदतीने काढला प्रियकराचा काटा, पंधरा दिवसानंतर भयंकर हत्याकांड समोर, महिला या संघटनेची पदाधिकारी
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने प्रियकराची हत्या केली आहे. प्रेम प्रकरणातून गळा चिरून खून झाल्याची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सचिन पुंडलिक औताडे असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकर तरुणाचे नाव आहे. भारती रवींद्र दुबे असे हत्या करणा-या प्रेयसी तरूणीचे नाव आहे. भारती ही पतीपासून विभक्त झाल्यानंतर कॅनॉट प्लेस येथे राहते. भारती व सचिन हे दोघे चार वर्षापासून छावा संघटनेत काम करत होते. त्यांची या काळत ओळख झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सचिन देखील विवाहित होता. भारतीने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. तो विवाहित असल्याने नकार देत होता. त्याच्या कुटुंबीयांकडूनही या लग्नाला विरोध होता. मात्र, सचिन हा भारतीवर संशय घ्यायचा. त्यातून त्यांच्यात वाद झाला. त्यात त्याने लग्नाला नकार दिल्यामुळे भारतीने त्याच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार ३१ जुलैला सचिन हा त्याची प्रेयसी भारती दुबे हिच्यासोबत होता. ते दोघे जालना येथे चारचाकीने लग्नाला गेले. तेथून परत कॅनॉटमध्ये येऊन फ्लॅटवरच थांबले. तेथे ते दोघे दारू पिले होते. त्या रात्री सचिन तेथेच थांबला होता. तेथेच भारती आणि सचिनचा वाद झाला. भारतीने तिचा मामेभाऊ दुर्गेश तिवारीला बोलावले. दुर्गेशने चाकूने गळा चिरून सचिनचा खून केला. त्यानंतर त्यांनी पैठणला गोदावरी नदीत त्याचा मृतदेह फेकला. वाहत गेलेला हा मृतदेह मुंगी गावात येथे तरंगत काठावर आला. कुटुंब बेपत्ता असलेल्या सचिन यांचा शोध घेत असताना १३ ऑगस्ट रोजी शेवगावलगत मुंगी येथील गोदापात्रात सचिन यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर या खुनाचा उलगडा झाला.
अहिल्यानगर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवित चार दिवसांत २ खुन्यांना बेड्या ठोकल्या. अद्याप एक आरोपी पसार आहे. दुर्गेश मदन तिवारी भारती रवींद्र दुबे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अफरोज खान हा पसार आहे. हे हत्याकांड समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.