Latest Marathi News
Ganesh J GIF

विवाहित प्रियकराने केला विवाहित प्रेयसीचा निर्घृण खून

पत्नीच्या मदतीने कट करून प्रेयसीची हत्या, एक मेसेज आणि पुजाचा खेळ खल्लास, नेमकं काय घडलं?

अमरावती – एका विवाहित तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना चांदूर रेल्वे शहरात घडली. त्यानंतर या तरुणाने मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून अपघाताचा बनाव केला. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास केला जात आहे.

पूजा सूरज उके असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली. याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी शुभम विठ्ठलराव हटवार याला अटक केली आहे. शुभम आणि पूजामध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण पुजाचे सुरजबरोबर लग्न झाले तर शुभमने देखील दुसऱ्या मुलीसोबत संसार थाटला. पण पूजा पतीच्या व्यसनाधीनतेमुळे आणि सततच्या मानसिक त्रासामुळे ती माहेरी चांदूर रेल्वेला परत आली. एकाच परिसरात असल्याने दोघांचे संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. या काळात पूजा शुभमवर लग्नाचा तगादा लावत होती. शुभम या दबावाने त्रस्त झाला आणि शेवटी त्याने तिचा खून करण्याचा निर्णय घेतला. घटनेच्या मध्यरात्री शुभमने पूजाला पत्नी माहेरी गेल्याचे सांगून आपल्या घरी बोलावले. त्याच घरात शुभम आणि त्याची पत्नी दोघांनी मिळून पूजाचा गळा दोरीने आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात बांधून दुचाकीवर टाकला आणि पहाटे रेल्वे पुलाजवळ नेऊन रुळांवर ठेवला. शुभमने पत्नीच्या मदतीने दोरीने पुजाचा गळा आवळून तिला ठार केले. तिचे शव पोत्यात बांधून मोपेडच्या मधात ठेवले. शुभम व त्याची पत्नी ते शव घेऊन रेल्वे पुलाखाली पोहोचले. जेणेकरून ही आत्महत्या वाटावी. प्रथम पोलिसांना ही घटना आत्महत्या वाटली. परंतु, डॉक्टरांनी शवविच्छेदनात गळा आवळल्याचे व्रण असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. आरोपी शुभमला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असता, त्याने पूजाने वारंवार लग्नासाठी दबाव आणल्यामुळे खून केल्याचे सांगितले.

या प्रकरणी शुभम हटवार आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!