
आंतरजिल्हा बदलीसाठी या विवाहित शिक्षिकेने केले दुसरे लग्न
खोटी कागदपत्रे सादर करत केली शासनाची फसवणूक, शिक्षिकेचे कारनामे पाहून थक्क व्हाल!
अ. नगर – शिक्षण हे पवित्र कार्य समजले जाते. त्यामुळे आजही शिक्षकांना मानाचे स्थान दिले जाते. पण काही वेळा हेच शिक्षक शिक्षिका असे काही कारनामे करतात की म्हणावे लागते सर/ मॅडम तुम्ही सुद्धा! कारण नगर जिल्हयातून एक धक्कादायक कारण समोर आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
पाथर्डी तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षिकेविरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यामुळे शिक्षण विभागालाचा गलथान कारभार समोर आला आहे. निवडुंगे येथील स्मिता अनिल ढोले यांनी एका महिला शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्मिता ढोले यांच्या म्हणाल्या की, शिक्षिकेने माझ्या नवर्यासोबत गुपचूप लग्न करत त्याच्यापासून एका मुलाला जन्म दिला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात बदलीचा लाभ घेतला असून आता नेमणुकीच्या मुख्यालयात राहत असल्याचे खोटे दाखले सादर केले असल्याची तक्रार केली आहे. नगर तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या एका घटस्फोट झालेल्या शिक्षिकेने माझ्या पतीबरोबर गुपचूप लग्न केले. त्यानंतर शाळेवर हजर असल्याचे दाखवून सोलापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये एका मुलाला जन्म दिला. तसेच संबंधित महिला शिक्षिकेने घटस्फोटीत असल्याचे कागदपत्र सादर करून सोलापूर जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात स्वतःची बदली करून घेतली. ग्रामसभेचा ठराव नसताना मुख्यालयी राहत असल्याचे खोटे स्वयंघोषणापत्र दाखल करून घर भाडे भत्ता देखील मिळवत आहे. त्यामुळे या शिक्षिकेवर प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नगर जिल्ह्यात करून घेतलेली बदली तात्काळ रद्द करण्यात यावी. तसेच खोटी माहिती शिक्षण विभागाला दिल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा इशारा दिला होता. शिक्षण विभागाने सदर शिक्षिकेविरुद्ध दोषारोप निश्चित केले असून अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
स्मिता ढोले यांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित महिला शिक्षिकेची विभागीय चौकशी सुरू केली असून याबाबत संबंधित महिलेला चौकशी पूर्ण झाल्यावर दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर संबंधित महिलेने आत्मदहनाचा इशारा मागे घेतला आहे.