Latest Marathi News
Ganesh J GIF

विवाहित महिला आणि तिच्या प्रियकराची धिंड काढून हत्या

खळबळजनक धिंडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, संतापलेल्या वडिलांनीच केली हत्या, प्रकरण काय?

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची वडिलांनी हत्या केल्याची घटना घडली होती. पण हत्या करण्यापूर्वी गावातून दोघांची ‘धिंड काढल्याचा’ व्हिडिओ व्हायरल झाला असून संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

संजीवनी सुरने ही उमरी तालुक्यातील बोरजुन्नी येथील रहिवासी आहे. एक वर्षापूर्वी गोळेगाव येथील सुधाकर कमळे या मुलासोबत झाला होता. कुटुंबियांनी मोठ्या थाटात विवाह केला होता. विवाहापूर्वी संजीवनीचा लखन भंडारे या तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरु होते. लग्नानंतरही दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते. सोमवारी सासरचे मंडळी बाहेर गेल्याने संजीवनी हिने आपल्या प्रियकराला घरी बोलवलं. त्यानंतर अचानक घरी परतलेल्या पती आणि सासरच्या मंडळींनी दोघांना नको त्या अवस्थेत बघितलं. त्यानंतर संजीवनीच्या पतीने सासरा मारोती सुरने यांना बोलावून घेतले आणि चांगलेच सुनावले, तसेच मुलीच्या अनैतिक सबंधावरून अपमान केला. त्यामुळे मारुती सुरने प्रचंड संतापले होते. घटनेच्या दिवशी दोघांना गावकऱ्यांसमोर हात बांधून मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर गावभर फिरवत धिंड काढण्यात आली. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरस झाला आहे. संजीवनीचे वडील मारुती लक्ष्मण सुरणे, काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे यांनी मिळून दोघांना निर्दयपणे ठार केले. मृतदेह जवळच असलेल्या बोरजुनी शिवारातील विहिरीत फेकून दिले होते.

 

उमरी पोलिसांनी संजीवनीचे वडील मारुती सुरणे, काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. मंगळवारी त्यांना भोकर न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!