Latest Marathi News
Ganesh J GIF

वाढदिवसादिवशीच विवाहितेची सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

चार महिन्यांपूर्वीच धुमधडाक्यात झाले होते लग्न, या त्रासामुळे मयुरी थकली, दिराच्या या वागणुकीचा मयुरीला धक्का, घेतला टोकाचा निर्णय

जळगाव – पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. त्यावेळी हुंडाबळी या विषयावर जोरदार चर्चा झाली होती. पण अजूनही या आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. जळगावमध्ये एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जळगाव शहरातील सुंदर मोती नगर या ठिकाणी सासरच्या जाताला कंटाळून एका नवविवाहितेने टोकाचा निर्णय घेत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. मयुरी ठोसरे असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. चार महिन्यांपूर्वी १० मे रोजी मोठ्या थाट्यात मयुरीचा लग्न समारंभ पार पडला. लग्नाला अवघे चार महिने होत नाही तोच सासरच्यांकडून मयुरीचा छळ केला जात होता. सतत पैशांची मागणी वाढू लागली होती. त्यामुळे मयुरी तणावात असायची विशेष म्हणजे दोन्ही कुटुंबांनी एकत्र यावर तडजोड देखील केली होती. पण मयुरीचा त्रास कमी होत नव्हता. मयुरीचा ९ सप्टेंबरला वाढदिवस होता. त्यामुळे माहेरुन पैसे देऊन तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर मयुरीने टोकाचा निर्णय घेत राहत्या घरात गळफास घेतला. धक्कादायक म्हणजे मयुरीचा मोठा दीर गणेश ठोसर याचा आधी घटस्फोट झालेला आहे. तो मयुरीसोबत अश्लील वर्तन करत असल्याचाही आरोप मयुरीचा नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा आरोप मयुरीच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे सासरच्या सर्व मंडळींवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मयुरीचा मृतदेह ताब्यात घेणार असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.

मयुरीच्या मृत्यूप्रकरणी तिचा मोठा दीर गणेश ठोसर, पती गौरव ठोसर, सासू लता ठोसर, किशोर ठोसर ,ननंद या सर्वांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयुरीच्या आई-वडील आणि भावाने केली आहे. आता पोलिस काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!