
विवाहित महिलेची प्रियकराने तोंडात स्फोटक भरून केली हत्या
विवाहानंतरही महिलेचे प्रेमप्रकरण सुरूच, या कारणामुळे प्रियकराने केली हत्या, रक्षितासोबत काय घडले?
म्हैसुर – कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका प्रियकराने त्याच्या विवाहित प्रेयसीच्या तोंडात ज्वलनशील पदार्थ टाकून तिची हत्या केली आहे. ज्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला आणि तिचा मृत्यू झाला आहे.
मैसूरच्या हुंसूर येथील गेरासनहल्ली येथे राहणाऱ्या रक्षिताच केरळच्या सुभाषसोबत लग्न झालं होतं. तिला एक दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याचवेळी रक्षिताचे बाहेर विवाहबाह्य संबंध होते. तिचे पेरियापटना तालुक्यातील बेट्टाडापुरा येथे राहणाऱ्या सिद्धाराजूसोबत अफेअर सुरु होते. लग्नानंतरही त्यांचं भेटणे सुरु होते. विशेष म्हणजे सिद्धाराजू हा रक्षिताचा जवळचा नातेवाईक लागतो. रक्षिता अन् सिद्धाराजू एकमेकांशी विवाह करण्याच्या विचारात होते, पण रक्षिताच्या घरच्यांनी तिचं लग्न केरळमधील तरुणाशी केलं होते.घटनेच्या दिवशी रक्षिता आणि सिद्धाराजू एका लॉजमध्ये थांबले होते. जिथे त्यांच्यात कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात आरोपीने रक्षिताच्या तोंडात स्फोटक पावडर टाकून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर सिद्धाराजूने आपला गुन्हा लपवण्यासाठी ‘मोबाइलचा स्फोट झाला’ अशी बनावट गोष्ट पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कमाल म्हणजे रक्षिताने सिद्धराजला भेटण्यासाठी केरळमधील सासूबाईंची तब्येत बिघडली आहे. ती त्यांना भेटायला जातेय, असे सांगून ती घराबाहेर पडली होती. जाताना ती तिच्या मुलाला माहेरीच सोडून आली होती. दरम्यान रक्षितच्या कुटुंबियांनी त्यांना रक्षिताच्या बाहेर सुरु असलेल्या प्रेम प्रकरणाची माहिती नव्हती, असे उत्तर दिले आहे.
पोलिसांनी तपास सुरु केल्यानतंर सर्व कटाचा पर्दाफाश झाला. सध्या सिद्धाराजूला अटक करण्यात आली आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. रक्षिताची हत्या करण्यामागचे नेमके कारण, हे आता चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.