
सध्या बुलढाणा जिल्ह्यात भाजप आणि शिंदे सेनेत धुसफुस सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाद विकोपाला गेल्याचे दिसते. शिंदे सेनेचे शिलेदार संजय गायकवाड हे त्यांच्या वक्तव्याने कायम चर्चेत असतात. तर त्यांचं आणि चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्यातील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे.

एका सभेत आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा आमदार श्वेता महाले यांच्यावर टीका केली आहे. आमचे सरळ काम आहे, छातीला छाती भिडवायचे आणि विषय खातम करायचा,मागून पाठीत खंजीर खुपसायचे आम्हाला जमत नाही . तर आम्ही पण पाहणार , कोणाला धमकी देणार, कोणाला जेलमध्ये घालणार,आमच्या पण कानावर आहे आमदार काय करतात, मी काही घरातला आमदार नाही असे आव्हान त्यांनी महाले यांना दिले.

मी पण एक आमदार आहे, महाराष्ट्रात देशांत माझे नाव आहे, पण एक माणूस सांगणार नाही की आमदार गायकवाड यांचा त्रास आहे म्हणून . चिखलीच्या आमदार म्हणतात की आमदार गायकआड यांनी माहितीच्या अधिकार टाकून सरपंचावर दबाव आणून प्रवेश घेतला . मात्र माहितीच्या अधिकारासारखे मी हिजडे धंदे कधीच करत नाही, टीका करताना गायकवाड यांची अशी जीभ घसरली. हे मी नाही करत, तुम्ही तुमच्या घरात चौकशी करा ,कोण करता आहे ते, आमचे सरळ सरळ काम आहे , छातीला छाती भिडवायची आणि विषय खातम करायचा, मागून पाठीत खंजीर खुपसायचा आम्हाला जमत नाही. अशाप्रकारची टीका पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनी श्वेता महालेवर केली. दोन दिवसांपूर्वी सुद्धा आमदार गायकवाड यांनी आमदार महालेवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देत आमदार महाले यांनी सुद्धा आमदार गायकवाड हे दबाव टाकून प्रवेश करून घेत असल्याचे म्हटले होते.

आम्ही चिखली मध्ये आलो ते आमचा पक्ष वाढवण्यासाठी, खासदार यांना कमी पडलेली मात्र वाढवण्यासाठी, जिल्हा परिषदचे जागा जिंकण्यासाठी. चिखली तालुक्यात माझे असंख्य नातेवाईक , पण माझ्याविषयी त्यांनी काही चांगले पोस्ट केली की त्याला धमकी देतात. आमच्या शिवसैनिकाला धमकी देतात. आतापर्यंत पाच सहा वेळा आमच्या शिवसैनिकांनी भाजपा आमदार निवडून आणला, आताही आणला, आणि त्याने काही काम सांगितले की त्याला म्हणताय आमच्या पक्षात प्रवेश घ्या, कोणत्याही कार्यकर्त्याने काम सांगितले की त्याला पक्ष सोडा म्हणतात असा आरोप गायकवाड यांनी भाजप आमदार महाले यांच्यावर केला. आमची बाळासाहेबांची शिवसेना आहे . शिवसेना चिरडायला निघत असेल तर आम्ही तो त्रास दूर करायला आलो आहे, विधानसभा लढायला नाही. आता आम्ही पण पाहणार , कोणाला धमकी देणार, कोणाला जेलमध्ये घालणार, आमच्या पण कानावर आहे आमदार काय करतात, मी काही घरातला आमदार नाही अशी खोचक टीकाही त्यांनी महाले यांच्यावर केली.

