
मराठी माणसाबरोबर पंगा म्हणून मनसेने चपराक देत उतरवला इंगा*
घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, मराठी माणसाला मारहाण आणि अपमान करणाऱ्या महिलेला मनसेचा प्रसाद
मुंबई – महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी वाद वाढत चालला आहे. आता त्याची तीव्रता लोकल ट्रेनपर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत या प्रकरणात दुकानदार किंवा मोठ्या कंपनीचे व्हिडिओ समोर येत होते. पण आता एका महिलेने लोकलमध्ये मराठी माणसाला मारहाण करत मराठीचा अपमान केल्याचा प्रकार घडला आहे.
परप्रांतीय लोक मराठी माणसांना विनाकारण त्रास देतात, अशा लोकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. अशीच एक घटना कळवा स्टेशन परिसरात घडल्याचं समोर आली आहे. अर्जून काटे हे लोकलने नियमित प्रवास करतात. ते प्रवास करत असताना एका परप्रांतीय महिलेनं ट्रेनमधून उतरत असताना धक्का दिला. त्यानंतर काटे यांनी महिलेसोबत मराठीत संवाद साधत तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिलेनं अर्जुन काटे यांना शीविगाळ करत मारहाण केली आणि मराठी लोकांबाबत अपशब्दही वापरले. महिलेनं विनाकारण धिंगाणा घातल्यानं काटे यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. अर्जून काटे यांच्या पत्नी स्वरा काटे मनसेच्या पदाधिकारी आहेत. त्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत परप्रांतीय महिलेला मनसेच्या जनसंपर्क कार्यालयात नेलं. त्यानंतर काटे यांनी महिलेच्या कानशिलात लगावली आणि तिला माफी मागायला सांगितलं. या घटनेबाबतची माहिती आणि व्हिडीओ मनसे पदाधिकारी विनायक बिटला यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. यावर सध्या अनेक उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला डिवचले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यामध्ये कोणतीही तडजोड करणार नाही मग ते कोणीही असो,यांचा माज उतरवणार हे नक्की. अशी समज या पोस्ट मधून देण्यात आली आहे.