Latest Marathi News
Ganesh J GIF

मोहिनी वाघचे मुलाच्या मित्राशीच होते अनैतिक संबंध

अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळेच झाली सतीश वाघ यांची हत्या, असे होते नियोजन?

पुणे – पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या त्यांचीच पत्नी मोहिनी वाघ यांनी घडवून आणल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर पोलीसांनी सगळ्या घटनाक्रमाचा खुलासा केल्यामुळे मोहिनी वाघचे काळे कारनामे समोर आले आहेत. त्यामुळे पुण्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.

सतीश वाघ यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह पुण्यातील शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला होता. त्यांच्या शरीरावर ७२ वार करण्यात आले होते. पुणे पोलीसांनी काही जणांना अटक देखील करण्यात आली होती. मात्र मुख्य सूत्रधार सापडत नव्हता. पण अखेर या सर्व प्रकरणामागे सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ असल्याचे समोर आले आहे. मोहिनी वाघ यांचे शेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध होते. पण सतीश वाघ हे प्रेमसबंधामध्ये अडसर ठरत असल्याने त्यांची हत्या करण्यात आली. सतीश वाघ यांच्या पत्नीचे त्यांच्या मुलाच्या मित्राशी अनैतिक संबंध होते. यात सतीश वाघ अडसर ठरत असल्यामुळे सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. मोहिनीचे आपला पूर्वीचा भाडेकरू असलेल्या अक्षय जवळकर बरोबर प्रेम संबंध होते.  अक्षय जवळकर हा सिव्हिल इंजिनियर आहे. त्याचं लग्न झालं असून त्याला मुलेही आहेत. दोघांचे अनैतिक संबंध गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून सुरू होते. वाघ यांना हे माहित झाल्यानंतर त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे अनैतिक संबंधासह पतीचा संपूर्ण आर्थिक व्यवहार आपल्याच ताब्यात असावा, या उद्देशाने ५ लाखांची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. आता पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोहिनी वाघ आणि आरोपी अक्षय जावळकर यांनी हा गुन्हा नक्की कोणत्या कारणाकरिता केला आहे? या गुन्हयाचा मुख्य सूत्रधार नक्की कोण आहे? याचा अधिक तपास गरजेचा असल्याने वानवडी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी योगेंद्र कवडे यांनी आरोपी मोहिनी वाघ हिला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!