Latest Marathi News
Ganesh J GIF

सतिश वाघ हत्ये प्रकरणी मोहिनी वाघचा आता या ठिकाणी मुक्काम

न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय, मोहिनी वाघच्या नव्या दाव्यांमुळे तपासात अडथळे?

पुणे – आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि हडपसरमधील शेतकरी तसेच हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिच्यासह सहा आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मोहिनी वाघ व अतिश जाधव यांच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यामुळे आता अनेक गोष्टींची उकल होण्याची शक्यता आहे.

मोहिनी सतिश वाघ,अतिश संतोष जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे व अक्षय जावळकर अशी न्यायालयीन कोठडी झालेल्यांची नावे आहेत. यावेळी न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील ज्योती वाघमारे यांनी युक्तिवाद केला. त्या म्हणाल्या जाधव व गुरसाळे यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार पेरणे फाटा येथील भिमा नदीपात्रात टाकले असल्याचे सांगितले आहे. त्यासमक्ष गोताखोर टिमच्या सहाय्याने नदीपात्रामध्ये शोध घेण्यात आला मात्र हत्यार अद्याप मिळुन आलेले नाही. त्यांनी गुन्ह्यात वापरलेले अन्य हत्यार नेमके कोठे ठेवले याचा तपास करायचा आहे. गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार कोण आहे? पडद्याआड नेमका कोणाचा हात आहे? याबाबत मोहिनी हिच्याकडे तपास करायचा आहे. याखेरीज, आरोपींच्या बँक खात्याचा अहवाल हस्तगत करायचे असून त्याचे विश्लेषण करून पुराव्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे, असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने बचावपक्षाचा युक्तिवाद ऐकून सर्व आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. दरम्यान या खून प्रकरणात २२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे, तसेच तपासाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे चौकशीही करण्यात येणार आहे. आरोपींनी खून करण्यासाठी वापरलेले दांडके, चाकू जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी अपहरण करण्यासाठी वापरलेली मोटार, दुचाकी जप्त केली आहे. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ हिने संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधांच्या संशयातून हत्या घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

नऊ डिसेंबर रोजी सकाळी सव्वासहाच्या सुमारास सतीश वाघ मॉर्निंग वॉकला गेले असताना त्याचवेळी फुरसुंगी फाटा परिसरातून नंबरप्लेट नसलेल्या चारचाकी गाडीतून चौघांनी त्यांचे अपहरण केले होते. याप्रकरणी सतीश यांचा मुलगा ओंकार वाघ याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!