Latest Marathi News
Ganesh J GIF

टँकरमधून पेट्रोल चोरी करणार्‍या प्रविण मडीखांबे टोळीवर मोक्का कारवाई ; १७ वर्ष सातत्याने करीत होते चोरी, १६२० लिटर डिझेल जप्त

लोणी येथून पेट्रोल, डिझेलचे टँकर वाटेत थांबवून त्यांच्यातून पेट्रोल, डिझेलची चोरी करणार्‍या प्रविण मडीखांबे यांच्यासह १२ जणांवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे.शुभम सुशील भगत (वय २३), तृशांत राजेंद्र सुंभे (वय ३१), रवी छोटेलाल केवट (वय २५), विशाल सुरेश गोसावी (वय ३०), कृष्णा ऊर्फ किरण हरीभाऊ आंबेकर (वय ३१), रोहितकुमार छेददुलाल (वय २५), अभिमान ऊर्फ सुभाष सुरेश ओव्हाळ (वय ३५), पांडुरंग निळकंठ नकाते (वय ४२), आकाश सुखदेव घोडके (वय २४), तेजस तुकाराम वाघमारे (वय २३) यांना अटक केली आहे. टँकर चालक आणि टोळी प्रमुख प्रविण सिद्राम मडीखांबे हे फरार आहेत.

लोणी काळभोरमधील एच पी सी एल व आय ओ सील एल कंपनीमधून टँकर बाहेर गेल्यानंतर इंधन बाहेर काढता येऊ नये, या करीता टँकरला कंपनीचे लोक लॉक करुन बाहेर पाठविले जाते. असे असताना कुंजीरवाडी येथील तुकाराम धुमाळ यांचे घराच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये टँकर घेऊन जाऊन त्यामधून पेट्रोल डिझेल बॅरेलमध्ये काढत असल्याची बातमी सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर व पोलीस अंमलदार ढमढेरे यांना १० सप्टेबर रोजी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ३ टँकरमधून इलेक्ट्रिकल मोटारीच्या सहाय्याने डिझेल बॅरेलमध्ये काढत असताना मिळून आले. या कारवाईत १६२० लिटर डिझेल जप्त करण्यात आले. या गुन्ह्यात पोलिसांनी १० जणांना अटक केली. या टोळीचा टोळीप्रमुख प्रविण मडीखांबे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली. गेल्या १७ वर्षात पेट्रोल डिझेल चोरीचे गुन्हे पुन्हा पुन्हा केलेले असल्याचे दिसून आले.

त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. पोलीस उपायुक्त आर राजा यांच्या मार्फत तो अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे सादर केला. या प्रकरणाची छाननी करुन मनोज पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे , सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट , मुंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस अंमलदार रामहरी वणवे, मंगेश नानापूरे, मल्हार ढमढेरे, शिवाजी जाधव, संदीप धुमाळ, बाजीराव वीर, योगेश पाटील या पथकाने केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!