
प्रियकरासाठी आईने पोटच्या मुलांची केली हत्या
विषबाधेचा बनाव करत हत्या लपवण्याचा प्रयत्न, गेट टुगेदर कार्यक्रमात जुन्या प्रेमाला पालवी फुटली आणि आईने...
हैद्राबाद – हैदराबाद येथील अमीनपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तीन मुलांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या आईला अटक केली आहे. पतीला सोडून प्रियकरासोबत नवीन जीवन सुरू करण्यासाठी तिने पोटच्या तीन मुलांची निघृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
रंजिता असे हत्या करणाऱ्या आईचे नाव आहे, तर शिवा असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. रजिताचे २०१३ साली चेनैय्यासोबत लग्न झाले होते. रजिता आणि चेनैय्या या दोघांमध्ये २० वर्ष वयाचे अंतर होते. या दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे. काही दिवसापुर्वी रंजिता ज्या शाळेत शिकली त्या शाळेत गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रजिता आणि शिवकुमार कित्येक वर्षांनी पहिल्यांदा भेटले. याच वेळी दोघांमधील जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पुन्हा प्रेम उफाळून बाहेर आले. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शिवाने रंजिताला तिच्या मुलांना सोडून येण्यास सांगितले. मात्र तिने तीन मुलांना मारून टाकण्याचा निर्णय घेतला. शिवाची अट पाहून रजिताने तिच्या मुलांचा काटा काढण्याची प्लॅनिंग केले. रजिताने ते शिवकुमारला सांगितले तो देखील त्यात सहभागी झाला. तिने झोपेतच साई कृष्णा (वय १२), मधुप्रिया (१०) व गौतम (वय ८) या तिन्ही मुलांना टॉवेलने एक-एक करून गळा आवळून ठार मारले. रात्री उशिरा जेव्हा तिचा पती चेन्नईया घरी परतला तेव्हा रंजिताने त्याला सांगितले की, मुलांनी पोटदुखीची तक्रार केली आहे. रात्रीच्या जेवणात दही- भात खाल्ल्यानंतर मुले बेशुद्ध पडल्याचेही तिने सांगितले, जेव्हा तिने वेदना होत असल्याचे नाटक केले तेव्हा चेन्नईया आणि त्याच्या शेजाऱ्यांनी चौघांनाही रुग्णालयात दाखल केले. जेव्हा हॉस्पिटल प्रशासनाला संशय आला त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर खाकीचा धाक दाखवताच रजिताने तिचा गुन्हा कबुल केला. संगारेड्डीचे पोलिस अधीक्षक परितोष पंकज यांनी सांगितले की, रंजिता आणि तिचा वर्गमित्र सुरु शिवकुमार यांना अटक करण्यात आली आहे. मुलांच्या हत्येच्या प्रकरणात दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
तीन मुलांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला असून तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले? याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.