
कार्यक्रमात तोल जाऊन पडल्याने खासदारांचा पाय मोडला
मुख्यमंत्र्यांसमोरच खासदारांचा गेला रोड, घटनेचा व्हिडीओ व्हायरल, वादग्रस्त खासदार अशी ओळख
पटना – बिहारमधील एका कार्यक्रमात पाय घसरून पडल्यामुळे खासदार अजय मंडल गंभीर जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यासमोरच ही घटना घडलि. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
‘खेलो इंडिया’च्या समारोप समारंभासाठी नितीश कुमार पोहोचले होते. त्यांच्यासोबत अजय मंडल हे देखील यावेळी उपस्थित होते. अजय मंडल यांचा तोल गेल्यावर ते खाली पडताच आजूबाजूचे लोक त्याच्याकडे धावले. यामध्ये त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचं उघड झालं आहे. मांडीलाही दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. खासदार अजय मंडल यांना जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. येथून त्यांनी पुन्हा एका खासगी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. अचानक ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मध्यंतरी बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात बुधवारी जद(यू) खासदार अजय कुमार मंडल यांच्या समर्थकांनी दोन स्थानिक पत्रकारांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. कुणाल शेखर आणि सुमित कुमार अशी त्या पत्रकारांची नावे होती. त्या घटनेचा व्हिडिओ देखील जोरदार व्हायरल झाला होता.
खासदार अजय मंडल जखमी झाले असले तरीही मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एकूण २०८ कोटी ६५ लाख २५ हजार रुपये खर्चाच्या ३२ योजनांचे उद्घाटन केले आणि १६ योजनांची पायाभरणी केली. अशाप्रकारे, त्यांनी एकूण ४८ विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करत भागलपूरमध्ये विकास कामांचा धडका उडवून दिला आहे.