
मिसेस मुख्यमंत्री म्हणतायेत “इस बार तेरे शहर में……
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, अनुभवा पाऊस आणि सुरांचा मिलाफ
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सामाजिक कार्यासह आपल्या गायनासाठी ओळखल्या जातात. यापूर्वी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या अनेक गाण्यांना त्यांच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आता त्यांचे नवीन आलेले गाणे प्रचंड लोकप्रिय झाले आहे.
अमृता फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया आकाउंटवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. “इस बार तेरे शहर में, जो सावन आया है, उसे मेरी आँखों ने … बरसना सिखाया हैं !” असे या गाण्याचे बोल आहेत. त्यांच्या या नवीन गाण्याला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळालं असल्याचं दिसत आहे. युट्युब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हे गाणं लाखोंच्या घरात गेलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून अमृता यांनी पावसाळ्याची जादू आणि भावनिक स्पर्श पुन्हा एकदा रसिकांपर्यंत पोहोचवला आहे. ‘सावन’ हे गाणे मूळतः गेल्या वर्षी प्रदर्शित झाले होते. यंदाच्या पावसाळ्यात त्याचे विस्तारित आवृत्ती आणण्यात आली आहे. याचबरोबर फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रदर्शित झालेले ‘मारो देव बापू सेवालाल’ हे गाणेही प्रचंड चर्चेत आहे. या गाण्याच्या व्हिडिओत अमृता बंजारनच्या भूमिकेत दिसल्या होत्या, त्यांच्या अभिनयाने आणि गायनाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. महत्त्वाचे म्हणजे सेवालाल गाण्याला बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यांनीही या गाण्याचे कौतुक करत सोशल मीडियावर त्याची पोस्ट शेअर केली होती. दरम्यान राजकीय विश्वात जितकी ओळख देवेंद्र फडणवीस यांची आहे, तितकीच फॅशन आणि सामाजिक कार्यक्षेत्रात अमृता फडणवीस यांची आहे. आपल्या वक्तव्यामुळे देखील अमृता फडणवीस चर्चेत असतात.
अमृता फडणवीस यांनी गायन क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे यापूर्वीचे अनेक गाणे प्रेक्षकांना आवडले असून, त्यांच्या प्रत्येक नव्या प्रोजेक्टकडे रसिकांचे लक्ष असते. गायनासोबतच त्या सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत.