Latest Marathi News
Ganesh J GIF

माझी लाडाची पिनू, प्रियांका…हात जोडून मी तुझी माफी मागतो

शिरीष महाराजांची मन हेलावणारी सुसाईड नोट, महाराजांवर इतक्या लाखाचे होते कर्ज, होणाऱ्या पत्नीला केली ही विनंती

पुणे- संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. शिरीष मोरे यांनी काल राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आता त्यांनी लिहलेल्या चार चिठ्ठ्या समोर आल्या आहेत.

शिरिष मोरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या समोर आल्या आहेत. यातील एका चिठ्ठीत त्यांनी होणाऱ्या बायकोची माफी मागितली आहे. या चिठ्ठीत त्यांनी म्हटले आहे की, माझी लाडकी पिनू, प्रियांका… खरं तर तुझा आता कुठं हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणि मी आता जातो आहे. तुझ्यासोबत थोडा काही काळ घालवायचा होता, पण तुला भेटून ही चूक करत आहे. त्यामुळे हात जोडून मी तुझी माफी मागतो. त्यामुळे मला माफ कर. कारण आयुष्यात सर्वांत जास्त मी अपराधी कोणाचा असेल तर तुझा आहे. माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या आहेत. त्यामुळे मला माफ कर… तुझाच अहो… शिरीष.” अशा शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच माझ्यावर एकूण ३२ लाखांचे कर्ज असून ते कर्ज मी कोणाकडून किती घेतले आहे, याची कल्पना बाबांना आहे. यात मुंबई सिंगवी-१७ लाख रुपये, बचत गट- ४ लाख रुपये, सोने तारण- २ लाख २५ हजार रुपये, गाडी- ७ लाख रुपये किरकोळ देणेदारी- ८० हजार रुपये आहे. एकूण ३२ लाखांपैकी कार विकून ७ लाख फिटतील.उरलेले २५ लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्यावी, अशी विनंती शिरीष महाराज मोरेंनी आपल्या मित्रांना केली आहे.

शिरीष महाराज मोरेंनी लिहिलेली पहिली चिठ्ठीम आई, वडील आणि बहिणीला, दुसरी चिठ्ठी होणाऱ्या पत्नीला, तिसरी चिठ्ठी कुटुंबाला आणि चौथ्या चिठ्ठीमध्ये आपल्या मित्रांना विनंती केली आहे. या घटनेने संपूर्ण मोरे कुटुंबावर आणि वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!