Latest Marathi News
Ganesh J GIF

‘माझ्या बायकोकडे पिस्तूल आणि सात बाॅयफ्रेड ती मला मारून टाकेल’

व्हिडिओ आणि १२०० पानांचे पुरावे घेऊन पती पोलीस स्टेशनमध्ये, पत्नीपासून संरक्षण देण्याची मागणी, प्रकरण काय?

मेरठ – मागील काही दिवसापासून पत्नीकडून आपल्याच पतीची हत्या करण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. मेरठमध्ये पतीला मारून त्याच्या मृतदेहाचे टुकडे ड्रममध्ये भरलेली घटना तर थरकाप उडवणारी होती. आता पुन्हा एकदा मेरठमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पतीने पत्नीपासून आपल्या जिवाला धोका असल्यचे सांगितले आहे.

मेरठमधील एका प्रकाशन संस्थेत व्यवस्थापक असलेल्या गौरव शर्माने एसएसपी कार्यालयात धाव घेत पत्नी रितांशी शर्मा उर्फ रितू विरोधात तक्रार दखल केली आहे. पत्नीचे ७ पुरुषांसोबत अवैध संबंध असून, ती प्रियकरांच्या मदतीने ४० लाखांच्या विम्यासाठी आपला खून करू शकते, तसेच तिला ड्रग्जचे व्यसन आहे, तिच्याकडे शस्त्रे आहेत आणि तिचे अनेक पुरुषांशी संबंध आहेत, असा दावा गौरवने केला आहे. गाैरव आणि रितांशा यांचा २०१२ मध्ये विवाह झाला आहे. सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर रितांशी घरच्यांसोबत उध्दट वागू लागली, अनेकवेळा तर ती मारहाण देखील करत असे त्यामुळे गाैरव आपल्या कुटुंबापासून वेगळे राहू लागले. पण तिच्यात सुधारणा होण्याएवजी ती जास्तच स्वैर वागू लागली.  ती अनेकदा अनेक दिवस घरातून गायब असायची आणि गौरवच्या अनुपस्थितीत पुरुष मित्रांसोबत ड्रग्जचे सेवन करायची. शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून, गौरवने गावातील त्याचा 12 वर्षांचा पुतण्या वंश शर्मा याला बोलावले, जो त्याच्या घरी राहू लागला. पुतण्याने केलेल्या खुलाशाने गौरवला धक्का बसला. पुतण्याने सांगितले की जेव्हा गौरव बाहेर असायचे तेव्हा घाणेरडे लोक रितांशीकडे यायचे आणि स्वतःला खोलीत बंद करून घ्यायचे, दारू पिऊन अश्लील बोलायचे. तिचे आशिष उर्फ ​​सनी, राज वर्मा, कुलदीप चौधरी आणि अमन सिंग यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचाही आरोप गाैरव यांनी केला आहे. हे आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे १२०० पानांचे स्क्रीनशॉट आणि अनेक व्हिडिओ आहेत असा दावा गाैरवने केला आहे. रितांशीकडे दोन बेकायदेशीर पिस्तूल आहेत, ज्या तिच्या एका पुरुष मित्राच्या आहेत. गौरवने दावा केला की रितांशी आणि तिचे साथीदार त्याला मारण्याचा आणि ४० लाख रुपयांच्या प्रवास विम्याचे पैसे हडप करण्याचा कट रचत आहेत. तसेच याआधीही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. तसेच आपला मृत्यू झाल्यास त्याला आपली पत्नी जबाबदार राहील असेही गाैरव शर्मा यांनी सांगितले आहे.

या प्रकरणाबाबत सीओ सदर देहात शिव प्रताप सिंह यांनी सांगितले की, गौरव शर्मा यांचा अर्ज एसएसपी कार्यालयात सादर झाला आहे आणि तो चौकशीसाठी भवनपूर पोलिस ठाण्यात पाठवण्यात आला आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल. हा प्रकार समोर आल्याने पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!