
नीलम मी खूप प्रयत्न केले पण तुझे मन जिंकू शकलो नाही. तू आता…
व्हिडिओ बनवत तरूणाने केली आत्महत्या, व्हिडिओ पत्नी, प्रेमी आणि नातेवाईकांवर गंभीर आरोप
मुरादाबाद – उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे प्रेम दिवसादिवशीच एका प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. मुरादाबादमध्ये पत्नीसोबत झालेल्या भांडणातून एका तरुणाने आत्महत्या केली आहे. पण आत्महत्या करण्यापुर्वी त्याने केलेल्या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे.
संदीप कुमार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे १५ वर्षांपूर्वी नीलमशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आहेत. पण, या पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद व्हायचे. संदीप कुमार यांचे सासर हे दलपतपूरजवळील वीरपूर गावात आहे. संदीप स्कूल व्हॅन चालवायचा आणि समोसे विकण्याचा व्यवसाय करायचा. संदिपने बनवलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, मी खूप प्रयत्न केले, पण तुझं(नीलम) मन जिंकू शकलो नाही. तू आता सुखी राहा… आपल्या मृत्यूसाठी संदिपने पत्नी आणि सासरच्या मंडळींना जबाबदार धरले आहे. तरुणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मृत संदीपच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्याची पत्नी नीलम जतीन नावाच्या मुलाशी बोलत असे. त्याने त्याच्या पत्नीच्या फोनमध्ये त्याचे चॅटिंगही पाहिले होते. या मुद्द्यावरून त्या जोडप्यात भांडणे व्हायची. गुरूवारी देखील नीलमच्या घरच्यांनी त्याला घरी बोलवून मारहाण केली होती. त्यामुळेच संदीपने टोकाचे पाऊल उचलले असा आरोप करण्यात आला आहे.
तरुणाने आत्महत्येपूर्वी बनवलेल्या व्हिडिओचाही तपासात समावेश करण्यात आला आहे. तक्रारीच्या आधारे मृताची पत्नी नीलमसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये संदीपने पत्नीसह सासरे, वहिनी, पत्नीचे काका-काकू आणि अन्य एका तरुणावर आरोप केले आहेत. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.