Latest Marathi News
Ganesh J GIF

नरेंद्र मोदींच्या सभेला कदम बांडे यांच्या एन्ट्रीमुळे नवीन ट्विस्ट ; कोल्हापुरात चर्चांना उधाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे. कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवारी धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे.कोल्हापूरच्या तपोवन मैदानात सभेचं आयोजन आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या सभेतून मोदी नेमकं काय भाष्य करणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. लाखोंच्या संख्येने कोल्हापूरकर सभेला उपस्थित रहाण्याचा अंदाज आहे. या सभेला महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती असणार आहे. तसंच या सभेला एक खास व्यक्ती उपस्थित राहणार आहे. याची कोल्हापुरात जोरदार चर्चा होत आहे.

नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापूरमध्ये सभेला राजर्षी शाहू महाराजांचे थेट वंशज असल्याचा दावा करणारे राजवर्धन कदम बांडे देखील उपस्थित राहणार आहेत. धुळ्याहून खास विमानाने राजवर्धन कदमबांडे कोल्हापुरात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान कदम बांडे देखील भाषण करणार आहेत. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत कदम बांडे यांच्या एन्ट्रीमुळे नवीन ट्विस्ट आला आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना 1962 ला कोल्हापुरात छत्रपती घराण्यात दत्तक घेण्यावरून वाद झाला होता. दत्तक प्रकरणाचा हा वाद अद्यापही न्यायालयात असल्याचा महायुतीच्या नेत्यांनी कालच दावा केला होता. आता आज मात्र राजवर्धन कदम बांडे नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित राहणार आहेत.

नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरातील तपोवन मैदानावर जाहीर सभा होतेय. तपोवन मैदानावर सभेची तयारी पूर्ण झाली आहे. पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी येणार आहेत. दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी कोल्हापूरमध्ये येणार आहेत. या सभेला राजवर्धन कदम बांडेदेखील उपस्थित राहणार आहेत.आज कोल्हापुरात सभा झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या 29 आणि 30 एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. पुणे शहर परिसरात अवकाश उड्डाणावर निर्बंध लावण्यात आलेत. राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची 30 एप्रिलला धाराशिवला जाहीर सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदी येणार असल्याने सकाळी 10 ते दुपारी 4 सुरक्षेच्या कारणास्तव धाराशिव-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद राहणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!