
हनिमूनसाठी फिरायला गेलेले नव विवाहित जोडपे गायब
लग्न झाल्यानंतर पंधरा दिवसातच झाली अटक, वाड्याची स्कुटी आढळली बेवारस अवस्थेत, जोडप्यासोबत नेमकं काय घडल?
भोपाळ – लग्नानंतर हानिमूनसाठी शिलाँगला गेलेले एक जोडपे गायब झाल्याची घटना समोर आली आहे. ११ मेला लग्न झालेले जोडपे २० मेला फिरायला गेले होते. या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
इंदूरमध्ये वाहतुकीचा व्यवसास करणारे राजा रघुवंशी यांचं ११ मे रोजी सोनम रघुवंशी यांच्याशी धुमधडाक्यात लग्न झाले होते. त्यानंतर नवदाम्पत्य २० मे रोजी हनिमूनसाठी इंदूरहून बंगळुरू आणि तिथून पुढे गुवाहाटीला गेलं होतं. गुवाटाटीमध्ये कामाख्या मातेचं दर्शन घेतल्यावर ते २३ मे रोजी शिलाँगला पोहोचले होते. शिलाँगला गेल्यावरही ते कुटुंबीयांच्या संपर्कात होते. मात्र २३ मे नंतर त्यांच्याशी असलेला कुटुंबीयांचा संपर्क तुटला. पण नेटवर्क समस्या असल्याने सुरुवातीला सगळ्यांनी दुर्लक्ष केले. पण दोन दिवसानंतरही संपर्क होत नसल्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले. शेवटी सोनमचा भाऊ गोविंद आणि राजा यांचा भाऊ विपिन शिलाँगला पोहोचले. गूगल मॅप आणि त्यांच्या फोटोंच्या माध्यमातून लोकेशन ट्रेस केलं तेव्हा त्यांनी भाड्यानं एक्टिव्हा घेतल्याचं समजलं. एक्टिव्हाने ओसरा हिलच्या दिशेनं दोघे गेले होते अशी माहिती समोर आली. पण ती एक्टिव्हा एका ठिकाणी बेवारस अवस्थेत आढळली. या भागात ओरसा नावाचे एक रिसॉर्ट देखील आहे, जे गुन्हेगारांचे अड्डे मानले जाते. सचिन रघुवंशी म्हणाले की, भाषेच्या समस्येमुळे स्थानिक पोलिसांकडून मदत मिळण्यास अडचण येत आहे.यानंतर इंदूरचे पोलीस आयुक्त संतोष सिंह यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डीसीपी क्राइम ब्रांच राजेश कुमार त्रिपाठी यांना तपासाची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान अपहरण, अपघात किंवा इतर काही कट रचल्याची शक्यता यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.
चौकशीदरम्यान, कुटुंबाला हे देखील कळले की ज्या ठिकाणी हे जोडपे सहलीला गेले होते, तिथून यापूर्वीही अनेक जोडप्यांच्या बेपत्ता होण्याच्या घटना घडल्या आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांची चिंता आणखी वाढली आहे.