
राज्यातच नव्हे तर देशातील अनेक भागात अजूनही गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांची गर्दी झाली आहे. त्यातच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी हलक्या वजनचा छोटू सिलेंडर आणला आहे.

ही सिलेंडरची संकल्पना जुनीच आहे. शहरात विविध भागातील विद्यार्थी, कामगार राहण्यासाठी येतात. विविध प्रशिक्षणासाठी अनेक जण शहरात दाखल होता. काही जण कामाच्या निमित्ताने शहरात येतात. अशा लोकांसाठी हा छोटू सिलेंडर फायद्याचा ठरतो. छोटू सिलेंडर हा 5 किलो वजनाचा आहे. विशेष म्हणजे हा छोटू सिलेंडर बुक करावा लागत नाही. त्यासाठी कुठलंही वेटिंग नाही. वाट पाहावी लागत नाही. थेट गॅस एजन्सीवर जाणून अथवा अधिकृत वितरकाकडे जाऊन ग्राहकांना गॅस सिलेंडर हंडी खरेदी करता येते.

इंडियन ऑईलने याविषयी ट्वीट केले आहे. घरगुती ग्राहकांसाठी 14.2 किलोचा गॅस सिलेंडर देण्यात येतो. प्रत्येक घरात विविध सरकारी कंपन्यांचा हा सिलेंडर घरपोच दिल्या जातो. पण त्यासाठी अगोदर बुकिंग करावे लागते. काही ग्राहक बुकिंग पेमेंट अगोदरच करतात. अथवा सिलेंडर डिलिव्हरी वेळी नगदी रक्कम मोजावी लागते. तर ज्या ग्राहकांकडे स्थानिक रहिवाशी पुरावा अथवा कुटुंब नाही अंशासाठी इंडियन ऑईलने 5KG FTL सिलेंडरची व्यवस्था केली आहे. एखाद्या किरणा दुकानावर अथवा जवळच्या इंडेन गॅस एजन्सीवर हे पाच किलोचे सिलेंडर सहज उपलब्ध आहेत. त्यासाठी ग्राहकांना कोणताही पुरावा द्यावा लागत नाही. त्यासाठी अगोदर बुकिंग करावी लागत नाही. या छोट्या इंडेन गॅस सिलेंडरविषयी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ट्वीट केले आहे.

https://x.com/IndianOilcl/status/2038619569938665648/photo/1

