Latest Marathi News
Ganesh J GIF

कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद, या गँगने घेतली जबाबदारी, या कारणामुळे केली हत्या

बटाला – पंजाबमधील गँगस्टर जग्गू भगवानपुरियाची आई हरजीत कौर यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत हरजीत कौर यांच्या चालकाही मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशिरा बटाला येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. टोळी युद्धातून ही घटना घडली आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

जग्गू भगवानपुरिया हा पंजाबमधील कुख्यात गुन्हेगार असून सध्या तो आसामच्या सिलचर तुरुंगात आहे. त्याच्यावर हत्या, ड्रग्ज तस्करी आणि खंडणी यांसारखे १२८ गुन्हे दाखल आहेत. सध्या तो आसामच्या सिलचर तुरुंगात बंद आहे. मार्च २०२५ मध्ये बठिंडाच्या तुरुंगातून सिलचर येथे एअरलिफ्ट करण्यात आले होते. त्याची आई हरजीत कौर स्थानिक राजकारणात सक्रिय म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी २०२२ मध्ये त्यांचा मुलगा भगवानपुरियाला तुरुंगात बुलेटप्रूफ जॅकेट देण्याची मागणी केली होती, त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान हरजीत कौर अर्बन इस्टेट भागातील आपल्या घराबाहेर स्कॉर्पिओत बसलेल्या होत्या. त्यांच्या शेजारी करणवीर सिंग होता. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी स्कॉर्पिओच्या पुढच्या सीटवर बसलेल्यांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि पळून गेले. या घटनेमध्ये हरजीत कौर गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमृतसरला रेफर करण्यात आले. तिथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी बबिबा गँगशी संबंधिक गँगस्टर डोनी बल, बिल्ला मांगा, प्रभू दासूवाल आणि कौशल चौधरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घेतली आहे. गोरे बरियार याच्या हत्येचा बदला घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या हत्येचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यात हल्लेखोर गोळीबार करुन पळून जात असल्याचे दिसत आहे. एकेकाळी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार हे जग्गूचे जवळचे मित्र मानले जात होते, परंतु आता या तिघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत. तसेच ते एकमेकांचे कट्टर विरोधकही बनले आहेत.

 

जग्गू स्वतः हा सिद्धू मूसेवाला हत्येचा आरोपी आहे. त्या प्रकरणात त्याची भूमिका नेमकी काय होती याबाबत सध्या तपास सुरू आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!