Latest Marathi News
Ganesh J GIF

‘आता कळला का माझा हिसका, आता जिवंत सोडत नाही’

जुन्या भांडणाच्या रागातून पती पत्नीवर गोळीबार, रस्त्यावर भयानक थरार, कुठे घडला धक्कादायक प्रकार?

मोहोळ – चार वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पंढरपूरहून परत गावाकडे येत असताना पती-पत्नीवर गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून समोर आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दशरथ केरू गायकवाड, असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवाजी जाधव , सुरेखा शिवाजी जाधव, अशी जखमी झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. शिवाजी जाधव यांनी चार वर्षापूर्वी मोहोळ पोलीस ठाण्यात दरशथ गायकवाड याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. शिवाजी जाधव आणि पत्नी सुरेखा जाधव पंढरपूरहून एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन करून परत येत होते. येवती गावाच्या शिवारात मोटारसायकवरून जाताना आरोपीने ‘आता कळला का माझा हिसका, आता जिवंत सोडत नाही,’ असे म्हणून हातातील पिस्तुलातून सुरेखा जाधव यांच्या पाठीमागील बाजूस दोन गोळ्या झाडल्या. तेव्हा, सुरेखा जाधव मोठ्याने ओरडल्याने गाडी थांबवून पत्नीला घेऊन शिवाजी जाधव खाली बसले. त्यानंतर गायकवाड तेथून पसार झाला. आणि थोड्या अंतरावरून परत शिवाजी जाधव यांच्याजवळ आला. मोटारसायकल थांबवून खाली उतर दहा फूट अंतरावरून हातातील पिस्तूलमधून दोन गोळ्या मारल्या. त्यातील एक छातीवर आणि दुसरी शिवाजी जाधव यांच्या डोळ्याजवळ लागली. नंतर आरोपी त्याची मोटारसायकल घेऊन रोपळे गावाच्या दिशेने निघून गेला. या हल्ल्यात शिवाजी जाधव यांना एक गोळी लागली, तर सुरेखा जाधव यांना तीन गोळ्या लागल्या. सुरेखा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय. दोघांनाही तातडीने सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुरेखा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चार वर्षांपूर्वी शिवाजी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दशरथ गायकवाड याला जमिनीच्या वादातून मारहाण केली होती. या घटनेनंतर दशरथने जाधव कुटुंबीयांविरुद्ध कायमच राग धरला होता. या जुन्या वैमनस्यातूनच दशरथने हा हल्ला केला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी दशरथ केरू गायकवाड या व्यक्तीच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे. त्याच्या तपासासाठी दोन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलिसांकडून सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!