Latest Marathi News
Ganesh J GIF

अरे बाप रे! नव्या नवरीचा डान्स पाहून नवरदेवाला फुटला घाम

नवरी अशी नाचू लागली की, नवरदेवाने गाणेच बंद केले, नवरीचा जगावेगळा डान्स एकदा बघाच!

मुंबई – लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे. आणि हा क्षण खास करण्यासाठी अनेकजण काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात आणखी उत्साह वाढवण्यासाठी आता नवरा नवरीदेखील डान्स करत एंट्री घेत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

लग्नात नवरा-नवरीच्या एन्ट्रीच्या बाबतीत पूर्वीपेक्षा बरेच बदल झाले आहेत. आता नवरा नवरीचा हात पकडत किंवा नवरी लाजत मान खाली घालून चालत प्रवेश करत नाहीत. अरेंज मॅरेज असो लव्ह मॅरेज असो… लग्नात नवरा-नवरीची एन्ट्री हा विषय आता पाहण्यासारखा असतो. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. पण काहीजणांना मंडपातच निर्णयाचा विचार करण्याची वेळ येत असते. व्हिडिओत दिसत आहे की, नवऱ्या मुलीचा डान्स इतका जोशात आणि हटके असतो की ती क्षणात सगळ्यांच लक्ष वेधून घेते. आजूबाजूच्या सर्व नजरा तिच्यावर खिळतात. पण या सगळ्यात नवरदेवाचा चेहरा मात्र पाहाण्यासारखा होतो. त्यामुळे तो उठतो आणि गाणे बंद करण्याबरोबरच नवरीला देखील शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. नवरीचा डान्स पाहून अनेकांना जबर धक्का बसलेला दिसत आहे. @iam_mahipal__ या इंस्टाग्रामवरून हा भन्नाट व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळवणारा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ अनेकांनी फेक असल्याचे म्हटले आहे. नवऱ्या मुलीचा कॉन्फिडन्स आणि नवरदेवाची रिअ‍ॅक्शन याबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. पण या व्हिडिओवर अनेकजण गमतीदार कमेंट करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!