Latest Marathi News
Ganesh J GIF

एक वडा पाव पडला ५ लाखांना !! चोरटयांनी डोळ्या देखत दागिन्यांची पिशवी केली लंपास

पुणे – दागिने सोडवून घेऊन घरी जात असताना वाटेत वडा पाव खाण्याची इच्छा झाली. पत्नीला दुचाकीजवळ थांबवून ते वडा पाव आणायला गेले. इकडे चोरट्यांनी पैसे खाली पडल्याचा बहाणा करुन पाच लाख रुपयांचे दागिने असलेली दुचाकीवरील पिशवी चोरुन नेली.

याबाबत दशरथ धामणे (वय ६९, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शेवाळवाडी येथील रोहित वडेवाले यांच्या दुकानासमोर गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी सेवानिवृत्त आहेत. त्यांनी ऊरुळी कांचन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे तारण म्हणून ४ लाख ९५ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवले होते. गुरुवारी त्यांनी ते दागिने सोडवून आणले. दागिन्यांची पिशवी त्यांनी दुचाकीला लावली होती. वाटेत रोहित वडेवाले या दुकानासमोर त्यांनी गाडी उभी केली. पत्नीला तेथेच थांबायला सांगून ते वडापाव घेण्यासाठी दुकानात गेले. इतक्यात त्यांच्या पाळतीवर असलेल्या चोरट्यांपैकी एक जण मोटारसायकलवर आला. त्याने त्यांच्या पत्नीला पैसे खाली पडले असल्याचे सांगितले. ते पाहून त्यांची पत्नी पैसे घेण्यासाठी दुचाकीच्या मागच्या बाजूला गेल्या. ही संधी साधून दुसर्‍या चोरट्याने दुचाकीला लावलेली दागिन्यांची पिशवी चोरुन नेली. पोलीस नाईक पांडुळे तपास करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!