Latest Marathi News
Ganesh J GIF

संतापजनक ! अहमदनगर जिल्ह्यात ११ वर्षीय मुलावर ९ जणांकडून लैंगिक अत्याचार ; आरोपींवर गुन्हा दाखल

अहमदनगर जिल्ह्यात ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना श्रीरामपूर शहरात घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर ९ जणांनी मिळून सामूहिक अत्याचार केला आहे. अत्याचार करणारे देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अत्याचार प्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.

११ वर्षीय अल्पवयीन मुलाला धमकावून हा अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मात्र, या घटनेनं पुन्हा एकदा अहमदनगरसह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!