संतापजनक !! १० महिन्याच्या चिमुकलीसोबत ३० वर्षीय नराधमाचे राक्षसी कृत्य; चिमुकलीच्या रडण्याच्या आवाजाने घटना उघडकीस
गुजरातमध्ये दहा महिन्याच्या चिमुकलीसोबत एका ३० वर्षीय नराधमाने राक्षसी कृत्य केले. चिमुकली अंगणात खेळत होती. तेव्हा आरोपी तिला त्याच्या घरी घेऊन गेला. आरोपीने तिच्या अत्याचार केला. चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिची आजी आरोपीच्या घराकडे गेली, तेव्हा आरोपी अत्याचार करत असल्याचे दिसले. चिमुकलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीलाही अटक केले आहे.
पोलिसांनी ज्याला अटक केली, त्या आरोपीचे नाव दीपक कुमार लालबाबू असे आहे. आरोपीचे पीडित चिमुकलीच्या घरी येणं-जाणं होतं. तो चिमुकलीसोबत खेळायचा. पीडितेची आई रेस्टॉरंटमध्ये काम करते. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (२२ सप्टेंबर) चिमुकली अंगणात खेळत होती. त्यावेळी आरोपी आला आणि त्याने चिमुकलीला उचलून घेतले. त्यानंतर तो तिला घरी घेऊन गेला आणि अत्याचार केला.आरोपी चिमुकलीला घेऊन गेल्यानंतर थोड्या वेळाने तिच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर तिच्या आजीने शोध घेणे सुरू केले. त्यानंतर आजी आरोपीच्या घरात गेली, तेव्हा ती रक्तबंबाळ झालेली होती. तिचा बाजूला आरोपी उभा होता.
त्यानंतर चिमुकलीच्या आजीने आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांना काय घडले हे कळले. ग्रामस्थांनी आरोपीला पकडले आणि बदडले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. चिमुकलीला आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलीस तपास करत आहे चिमुकलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती डीएसपी कुशल ओझा यांनी दिली.