
संतापजनक! पुण्यात दुचाकीवर कपलचे अश्लील चाळे
भररस्त्यात अश्लील चाळे करणाऱ्या कपलचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, लाज सोडून अश्लील चाळा, कारवाई होणार?
पुणे – पुणे हे एकेकाळी शिक्षणाचे माहेरघर होते. तसेच पुण्याला एक सांस्कृतिक ओळख होती. पण त्याच पुण्यात आता अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशातच, भररस्त्यात धावत्या दुचाकीवर रोमान्स करताना एका प्रेमीयुगुलांचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे पुणेकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दुचाकीवर हे कपल बिनधास्त अश्लील चाळे करत असल्याचे दिसून आले आहे.
पुण्यातील व्हायरल होणारा व्हिडिओ हा शिंदेवाडी परिसरातील आहे. शिंदेवाडी भागातील खेड शिवापूर परिसरातून जाणाऱ्या मार्गावर हे प्रेमीयुगुल प्रेमात अखंड बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पुरूष गाडी चालवत आहे. दुचाकीच्या टाकीवर महिला पुरुषाकडे तोंड करून बसलेली आहे. रस्त्यावरून जात असताना या जोडप्याचे अश्लील चाळे सुरू होतात. महिला आधी टाकीवर झोपते. त्यानंतर ती पुरूषाच्या गळ्यात पडताना दिसते. आणि त्याला मिठ्या मारताना दिसत आहे. पाठीमागून येत असलेल्या एका दुचाकीस्वाराचे या जोडप्याकडे लक्ष गेले. त्याने त्यांचा व्हिडीओ शूट केला. बरेच अंतर पुढे जाईपर्यंत या जोडप्याचे दुचाकीवर अश्लील चाळे सुरू होते. पुण्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. कोणी म्हणतंय की ही अश्लीलता आहे काही जणं तर हे धोकादायक पद्धतीने वाहन चालवणं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी देखील केली जात आहे. दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा वाहतूक सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुणे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, व्हिडिओच्या आधारे या जोडप्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे.