संतापजनक! बॉसशी संबंध ठेवण्यासाठी पत्नीवर दबाव
विवाहितेचा १५ लाख रुपयांसाठीही छळ, नकारानंतर बेकायदेशीर तलाक देत काढले घराबाहेर
कल्याण – पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना डोंबीवलीमध्ये घडली आहे. एका इंजिनियर पतीने आपल्या पत्नीला बॉससोबत शारिरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तलाक दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित पत्नीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी पती सोहेल शेखविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल शेख हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून कल्याणमध्ये राहतो. त्याच्या पत्नीला त्याने एका पार्टीमध्ये बॉससोबत शारिरिक संबंध ठेवायला सांगितले, मात्र पत्नीने याला नकार दिला. तसेच पतीने आपल्या पहिल्या पत्नीला देण्यासाठी माहेरून १५ लाख रुपये आणायला सांगितले, मात्र तिने आणले नाही. यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीला तीन तलाक दिला आहे. कहर म्हणजे त्याने तिला यानंतर घराबाहेर काढले. त्यामुळे ही महिला छत्रपती संभाजीनगरला गेली, यानंतर तिने छत्रपती संभाजीनगरमध्येच पतीविरोधात तक्रार दाखल केली, नंतर ही तक्रार कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली आहे. तीन तलाक कायद्याने बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे. तरीही तलाकचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आता या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश हरिपंत गाडवे करत असून आरोपी अद्याप फरार आहे.
पती पत्नीचे नाते विश्वासाच प्रेमाच असत, पती पत्नीला एकमेकांची सोबत सुरक्षित वाटते, पण या नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे.