
संतापजनक! दागिन्यांसाठी आईच्या चितेवर झोपला मुलगा
आईच्या प्रेतासमोरच भावांंमध्ये दागिन्यांसाठी जोरदार वाद, संतापजनक भांडणांचा व्हिडिओ व्हायरल
राजस्थान – आजकाल कोण कोणाचे नाही असे सतत म्हटले जाते. आणि हे सत्यही आहे.पण आता राजस्थानमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. आईच्या मृत्यूनंतर दागिण्यासाठी भावांनी आईच्या प्रेतासमोरच भांडण केले आहे.
राजस्थानमधील कोटपुतली-बहारोड जिल्ह्यातील लीला का बास गावात, एका मुलाने फक्त चांदीच्या बांगड्यांसाठी स्वतःच्या आईचे अंत्यसंस्कार थांबवले. ही संपूर्ण घटना ३ मे रोजी दुपारी घडली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. गावात राहणाऱ्या भूरी देवी यांचे निधन झाले होते. कुटुंबातील आणि गावातील अनेक लोक त्याच्या अंत्यसंस्काराच्या तयारीत व्यस्त होते. अंत्ययात्रा सुरू झाली आणि पूर्ण विधी आणि समारंभांसह स्मशानभूमीत नेण्यात आली. पण तिथे आईच्या चांदीच्या बांगड्यावरून भावात वाद सुरु झाला. भूरी देवीच्या सात मुलांपैकी पाचवा मुलगा ओम प्रकाश अचानक चितेवर पडला आणि त्याने अंत्यसंस्कार थांबवले. त्याची मागणी अशी होती की जोपर्यंत त्याला त्याच्या आईच्या चांदीच्या बांगड्या आणि इतर दागिने दिले जात नाहीत तोपर्यंत तो अंत्यसंस्कार करू देणार नाही. हे पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. अनेकांनी समजावून देखील तो ऎकण्यास तयार नव्हता अखेर घरातून दागिने आणले आणि स्मशानभूमीत ओम प्रकाश यांच्याकडे सुपूर्द केले. यानंतर तो चितेतून उठला आणि त्यानंतर त्यांच्या आईचे अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेचा व्हिडिओ कोणीतरी शुट करून व्हायरल केल्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भूरी देवीचे दागिने प्रथम त्यांचा मोठा मुलगा गिरधारी याला देण्यात आले. पण भावांमध्ये वर्षानुवर्षे मालमत्ता आणि दागिन्यांवरून वाद सुरू होता. आईच्या मृत्यूनंतर हा वाद उघडकीस आला. सध्या या प्रकाराबद्दल सगळीकडे संताप व्यक्त होत आहे.