
ओयोच्या संचालिकेची पोलीसाला चप्पलने बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, ओयोबाबत प्रश्न विचारल्याने संताप, प्रकरण काय?
फरीदाबाद – ओयो हॉटेलच्या संचालिकेने वाहतूक पोलिसाला चप्पलांनी मारहाण केल्याची घटना फरिदाबादमध्ये उघडकीस आली आहे. संतापजनक म्हणजे मारहाण करतानाचा व्हिडिओ शुट करत तो सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे रोष व्यक्त होत आहे.
वाहतूक पोलिस अधिकारी दीपक यांना दयाल हॉस्पिटलच्या चौकात वाहतूक नियंत्रणाची ड्युटी मिळाली होती. तिथे त्यांना दुसऱ्या चौकात कोंडी झाल्याची माहिती मिळाली. त्यांना पुढील चाैकात कोंडी झाल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे ते त्या ठिकाणी गेले असता, ओयो हाॅटेलबाहेर चुकीच्या पद्धतीने गाड्या पार्क केल्यामुळे ही कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्या गाड्या कोणाच्या आहेत हे त्याने बाहेरच उभ्या असलेल्या हॉटेलच्या संचालिका आणि तिच्यासोबतच्या अन्य दोघांना विचारले. यामुळे संतापलेल्या रंजित कौर, सोनू आणि करण यांनी दिपक यांना हाॅटेलमध्ये घेऊन जात बेदम मारहाण केली आहे. व्हिडीओमध्ये रंजित कौर चप्पल काढून दीपक यांना मारताना दिसत आहे, तर ती आपल्या साथीदारांना व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सांगत आहे. दीपक यांनी “मारहाण करू नका” अशी विनवणी केली, पण तरीही त्यांनी दिपक यांना बेदम मारहाण केली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रंजित कौर, सोनू आणि करण यांना अटक केली. या प्रकरणी गुन्हा केला आहे. फरिदाबाद पोलिसांनी याचा सखोल तपास सुरू केला असून, लवकरच सविस्तर माहिती समोर येण्याची शक्यता आहे.