पुण्यात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्या दोघांना अटक, २ गावठी पिस्तुले जप्त
आगामी सण उत्सव लक्षात घेऊन पर्वती पोलीस ठाण्यातील तपास पथकाने पिस्तुल बाळगणार्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले जप्त केली आहेत.
नवरात्र उत्सव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा शस्त्रे बाळगणार्यावर कारवाई करण्याचा आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी गुन्हे प्रकटीकरण कक्षाला दिला होता. त्यानुसार, पोलीस अंमलदार अमोल दबडे व अमित चिव्हे यांना मिळालेल्या बातमीनुसार बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्या तन्मय राजू थोरात वय २१) आणि प्रशांत बाळासाहेब धुमाळ (वय ३५) यांना गावठी पिस्तुलासह पकडले. पोलीस उप निरीक्षक सचिन पवार तपास करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, किरण पवार, पोलीस अंमलदार अमोल दबडे, अमित चिव्हे, सुभाष मोरे, पुरुषोत्तम गुन्ला, सद्दाम शेख, सूर्या जाधव, अनिस तांबोळी, अविनाश कांबळे, राकेश क्षीरसागर यांनी केली आहे.