Latest Marathi News
Ganesh J GIF

सासरच्या छळाला कंटाळून पोलिसाच्याच पत्नीची आत्महत्या

पोलीस वसाहतीतच केली आत्महत्या, महिलेच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप, महिलेसोबत सासरमध्ये नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर – सासरच्या सतत होणाऱ्या छळाला कंटाळून पोलिसाच्याच बायकोने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या
केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही आत्महत्या छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयातील वसाहतीमध्ये घडली आहे. त्यामुळे याची चर्चा जात होत आहे.

सबा समीर शेख असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव होते. सबा शेख आय ब्लॉक पोलिस आयुक्तालय वसाहतीमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. तिचे अडीच वर्षांपूर्वी पोलिस कॉन्स्टेबल समीर शेख याच्याशी लग्न झाले होते. समीर शहर पोलिस दलात कार्यरत असून सध्या जीन्सी पोलिस ठाण्यात विशेष शाखेत कार्यरत आहे. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला सबाला चांगली वागनुक देण्यात आली. पण त्यानंतर पती समीर आणि सासरच्यांनी सबाला त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून सबा माहेरी गेली होती. मात्र, दोन्ही कुटुंबामध्ये मध्यस्थी झाल्यानंतर सबाला पुन्हा सासरी नांदायला पाठवण्यात आले. त्यानंतर समीर हा तिच्यावर वेगवेगळी बंधन घालत होता. या त्रासाला सबा कंटाळली होती. या त्रासाला सबा कंटाळली होती. गुरुवारी सकाळी सबाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली, हा प्रकार सबाच्या दिराच्या लक्षात आला. तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे सबा गंभीर जखमी झाली होती. तिच्या दिराने तिला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारादरम्यान दुपारी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, दसऱ्याच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

सबाचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी नातेवाईकांनी तात्काळ बेगमपुरा पोलिस ठाणे गाठत सबाचा नवरा आणि सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. या प्रकरणाची पुढील कारवाई पोलिस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!