Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यध्यापक पत्नीने पतीला दारूत विष पाजून केला खून

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घेतली विद्यार्थ्यांची मदत, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

यवतमाळ – प्रेम विवाह केलेल्या पत्नीने पतीला विष देऊन ठार केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर तो मृतदेह विद्यार्थ्यांच्या मदतीने नष्ट केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

शंतनू देशमुख असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे, तर निधी देशमुख असे हत्या करणा-या पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शंतनू आणि निधीने प्रेमविवाह केला होता. पण तो विवाह कुटुंबियांना मान्य नसल्याने ते विभक्त राहत होते. पण लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्यात सतत वाद होत होऊ लागले. त्यातूनच निधीने आपला पती शंतनू याला संपवल्याची माहिती समोर आली आहे. १३ ते १४ मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास यवतमाळ शहरालगतच्या चौसाळा जंगलात १५ मे रोजी जळालेल्या अवस्थेत शंतनूचा मृतदेह आढळला होता. निधीने आपल्या पतीला विष देऊन आधी जीव घेतला होता. त्यानंतर तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चौसाळा येथील टेकडीवरती टाकला होता. त्यानंतर तिने आपल्या विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी मृतदेह पेटवून दिला. पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करत या प्रकरणाचा उलगडा केला आहे. शंतनू दारूच्या आहारी गेला होता. त्याच्यापासून सुटका मिळविण्यासाठी निधीने हत्येचा कट रचला. तिने गुगलवर सर्च करून विषारी ज्यूस तयार केले. दारूच्या नशेत असलेल्या शंतनूला पाजले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी निधीसह तीन मुलांना अटक केली आहे. घटनास्थळावरुन जप्त अर्धवट जळालेल्या शर्टाच्या बाहीचा तुकडा व शर्टाचे बटन हे शंतनु देशमुख याचे असल्याचे मित्रांनी ओळखले. त्यामुळे खुनाचा उलगडा होण्यास मदत झाली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!